माझे दैवी अनुभव भाग १७
त्या दिवशी ताईवर झालेला रेकीचा Impact पाहून मी रेकी ची पुढची Level Complete करायचं ठरवलं. माझ्या मित्राच्या ओळखीचे एक सर होते आणि मी त्यांच्याबद्दल बरंच चांगलं ऐकलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडेच पुढची Level करायची असं माझं आधीच ठरलं होतं. तरी ऑफिस आणि बाकी कामं यात ६ महिने गेले. शेवटी एक दिवस मी त्यांना Phone केला. ते म्हणाले मी महिन्याला एकच Course घेतो तुम्ही पुढच्या महिन्यात या. पुढचा महिना म्हणजे जून. तारीख वगैरे सगळी ठरली. गम्मत म्हणजे आम्ही जिकडे सोहळ्याला गेलो होतो तिथून अगदी जवळच हा Course होता. तो एक रविवार होता. सकाळी प्रचंड पाऊस सुरु होता पण तरीही माझं जायचं पक्कं होतं. Car घेऊन मी साधारण पाच-साडेपाच वाजता पुण्याहून निघालो. जवळपास पावणे नऊ वाजता मी त्या शहरात पोहोचलो. त्या सरांना Phone केला. सर, मी इथे इथे आहे तर तिथे कसं यायचं? मी विचारलं. ते म्हणाले अरे तू अगदी तिथेच आहेस. सर म्हणाले. माझ्याकडे त्या जागेचं Google Location होतं. Google ने मला सांगितलं की Your destination has arrived. Google दृष्टीने आलेलं हे destination मला काही दिसेना. Traffic आणि पाऊ...