माझे दैवी अनुभव भाग ११
जन्मपत्रिका म्हणजे आपल्या जन्माच्या वेळची ग्रहस्थिती. यात आपल्या पूर्वजन्मातील कर्माचा लेखाजोखा असतो. त्यामुळे याजन्मातील कर्माचा हिशोब जन्मपत्रिकेत दिसत नाही. अगदी याचमुळे या जन्मातील कर्माला विशेष महत्व प्राप्त होते. आपले भविष्य हे मागच्या जन्मातील कर्माचा आणि या जन्मातील या आधीच्या कर्माचा मेळ आहे आणि अगदी इथेच ज्योतिषाचा उत्तम उपयोग होतो. आपले पूर्वकर्म काय निर्देशित करते आणि आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्याकरिता अडचणी काय आहेत हे समजून घेऊन त्यावर योग्य उपाय केले तर आयुष्यात मोठा बदल सहज घडवता येतो. पण माझ्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे असा प्रश्न विचारून केवळ दैवावर अवलंबून राहिलो तर ज्योतिषाचा विशेष उपयोग होत नाही. उपाय म्हटले कि आपल्या मनात पूजा, शांती, वगैरे असल्या गोष्टी येतात पण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाणे, चांगल्या आरोग्याकरीता व्यायाम करणे, जोखीम आहे तिथे Insurance घेणे हे सगळे उपायच आहेत. हे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं तेव्हा मी विविध प्रकारच्या उपायांचा अभ्यास करायचं ठरवलं. वर दिलेले उपाय आपण सगळेजण करतोच म्हणून मी थोडे Unconventional उपाय शिकायचं ठरवलं. माझे सासरे र