परवाच मुलीला सुट्टी लागली. सुट्टीत आमच्याकडे तात्विक चर्चा फार होतात कारण तेवढाच वेळ मिळतो. सकाळी ९ला शाळेत जाऊन संध्याकाळी ९ला परत येणाऱ्या मुलांना बाकी वेळ तरी कुठे असतो? मुलीला शाळेत nutrition या विषयावर एक धडा आहे. त्याबद्दल आम्ही बोलत होतो. त्यात मुख्यत: झाडं अन्न कसं तयार करतात यावर चर्चा चालली होती. त्यात एक chemical equation आहे. Carbon Dioxide (Co2) व पाणी (H2O) यांच्या संयोगाने, सूर्याप्रकाशाच्या मदतीने Chlorofill असलेली म्हणजेच हिरवी झाडं Glucose म्हणजेच अन्न कसं तयार करतात. यावर चर्चा झडत होती. मुलीने मला या सगळ्याबद्दल सखोल माहिती दिली. जर झाडांना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश लागत असेल तर प्राण्यांना अन्न पचवण्यासाठी D Vitamin ची आवश्यकता असावी. मी माझा गावठी मुद्दा मांडला. 'बाबा, सूर्यप्रकाश म्हणजे D Vitamin नव्हे.' मुलीने माझा मुद्दा सरळ खोडून काढला. 'हो, पण सूर्याप्रकाश म्हणजे अन्न नव्हे तरीही सूर्याप्रकाशाशिवाय झाडांमध्ये अन्न तयार होत नाही. हे तसंच आहे.' मी सफाई दिली. अशीच चर्चा पुढे गेली. दावे प्रतिदावे झाले आणि 'याचं काहीतरी वेगळंच असतं'