ॐ कार प्रधान
दर वर्षी स्वस्ति कोणत्या तरी workshop मध्ये जाऊन शाडूच्या मातीचा गणपती करायची पण त्याने ती एवढी खुश नसायची कारण तिला मदत घ्यायला फार आवडत नाही. Sculpture हे तिचं आवडतं skill आहे त्यामुळे तिला स्वतःला कोणाचीही मदत न घेता गणपती करायचा होता. त्यांच्या शाळेत गेल्यावर्षी पासून sculpture शिकवू लागले. ती सुद्धा बारीक सारीक काही काही करत गेली. या वर्षी म्हणाली की दादाला (म्हणजे सरांना) सांगून मी शाळेतून गणपती करुन आणते. मागचा अनुभव पाहता मी म्हटलं की पण शाडूची माती ठिसूळ असते. गणपती घरी पोहोचेपर्यंत राहील ना? आणि पावसाचे दिवस आहेत त्यामुळे मूर्ती सुकेल तरी का? स्वस्ति म्हणाली ओलीच मूर्ती घरी आणते म्हणजे काही झालं तर पुन्हा जोडणं सोपं पडेल. Finishing पण घरी आल्यावरच करते. शाळेतून गणपती आला न आला तरी पण दुकानातून आणण्याऐवजी यावर्षी घरातल्या गणपतीचीच पूजा करायची असं आम्ही ठरवलं. तसं सगळं अवघड होतं कारण Van मधे 8-10 तरी मुलं असतात. शाळा घरापासून पंधरा एक किलोमीटर लांब आहे. मुलं van मध्ये मजा मस्ती करतात. त्यामुळे गणपतीचं हे आगमन फार सोपं वाटत नव्हतं. आणि van काही तिला अगदी घरापर्यंत सोडत नाही. आम्...