मधुमेहाची महामारी - ३
#madhumehachi_mahamari मधुमेहाचा देहावर होणारा खरा परिणाम आम्हाला २०१७ पासून कळू लागला. दरवर्षी आईचे diabetologist तिला kidneys scan (mostly sonography) करायला सांगत आणि २०१७ मध्ये पहिल्यांदाच तीच्या kidneys चा आकार कमी झालेला दिसला. त्यानंतर पुढे सलग 3 वर्षे kidneys चा आकार कमी होत गेला. पुढे तिला Covid झाला आणि Covid मध्ये पहिल्यांदा याचे परिणाम दिसले. तिचे electrolytes imbalance झाले असावेत आणि त्यामुळे तिला भास होऊ लागले. त्यावेळी infection कमी होतं म्हणून ती घरीच isolation मध्ये होती आणि Covid चे काय काय side effects होतात ते स्पष्ट नव्हतं. या सगळ्यात kidneys मुळे electrolytes imbalance झाले असतील हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. कालांतराने तिचे भास कमी झाले आणि ती बरी झाली. त्यामुळे हा विषय मागे पडला. त्यानंतर तिला जेव्हा पुन्हा असे अनेक भास एका रात्री झाले, तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांना माहित असलेले सगळे मंत्र म्हटले पण काही फरक पडला नाही. या सगळ्यात शेवटी ती almost unconscious झाली. त्यांनी सगळी हकीगत मला phone करुन यानंतर सांगितली (ते म्हणाले तिला कसली तरी बाधा असावी). आणि ...