मधुमेहाची महामारी - १
साधारण 25 ते 30 वर्षांपूर्वी, आधी माझ्या आईला आणि मग बाबांना मधुमेह झाला. आमच्या घरात आधीच्या पिढीत कोणालाही मधुमेह नव्हता त्यामुळे मधुमेहाची ही पहिलीच पिढी. या निमित्ताने आम्ही अनेक वेगवेगळे doctors आणि वैद्य सुद्धा पाहिले. पहिली 5 वर्षं तर आईने खूप strict diet केला आणि योग सुद्धा केला. शेवटी तिला याचा कंटाळा आला आणि मग तिने औषध सुरु केलं. आजकाल ठराविक वय झालं की मध्यम वर्गीय कुटूंबात कोणाला ना कोणाला तरी diabetes असतोच कदाचित त्यामुळेच तो एवढा seriously घेतला जात नाही की काय अशी मला शंका आहे.
यानिमित्ताने आम्ही काही diabetologist ना सुद्धा भेटलो. आता कोणाला dianetes होईल आणि साधारण कधी होईल हे शोधाण्याचा doctors प्रयत्न करू लागलेले आहेत. असेच आम्ही सगळे एकदा एका diabetologist कडे गेलो असता त्यांनी आम्हाला 'sugar factory' असं संबोधलं. 😀 तेव्हा मी माझी बायको आणि लहान म्हणजे 3-4 वर्षांची मुलगी असे तिघे तिथे होतो. माझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा diabetes आहे. हे लक्षात घेऊन, माझा आणि माझ्या बायकोच्या पोटाचा घेर मोजून आणि आमची वजनं पाहून त्यांनी आम्हांला येत्या काही वर्षात (माझ्या बायकोला 5 वर्षात आणि मला 7 वर्षात) diabetes होईल असं भाकीत केलं.
मी साधारण आमच्या आजूबाजूची माणसं पहिली आणि मला वाटलं की या theory मध्ये अर्थ असू शकतो. कारण माझ्या बाबांचं पोट बरंच मोठं होतं, पण आमच्या घरातील शेतात काम करणाऱ्या काही मंडळी मात्र अगदी flat tummy असलेल्या होत्या आणि त्यांना diabetes सुद्धा नव्हता. त्यामुळे ही theory बरोबर असावी असं माझं मत तयार होत होतं. आता पोट कमी केलं की झालं, मग काय diabetes वगैरे होणार नाही असं ठरवलं आणि मी तसा plan करू लागलो.
क्रमश:
(C) Gaurish Borkar
#gaurishborkar
#diabetes
#thinkingaloud
Interesting. Waiting for next article
ReplyDelete