Posts

Showing posts from September, 2023

चिंगीचा बाप्पा

Image
 गणपतीच्या आदल्या दिवशी office मधून घरी येता येता पाहिलं तर आमच्या Watch women ची मुलगी मातीचा गणपती तयार करत होती. मला खाली यायला थोडा उशीर झाल्याने कल्याणीचं आणि तिचं आधीच थोडं conversation झालं होतं याची मला काहीच कल्पना नव्हती. एका gas cylinder वर एक फळी ठेऊन ती मातीचा गणपती तयार करत होती. अरे वा गणपती का? माती गाळून घेतली का? असा प्रश्न मी विचारल्यावर तिने माझ्याकडे जो कटाक्ष टाकला त्यात अनेक shades होत्या. हा स्वतः ला समजतो कोण? मी काय वेडी आहे का? मी काय पहिल्यांदाच मातीच्या वस्तू करतेय का? वगैरे वगैरे… असे बरेच अर्थ मला त्या कटाक्षात जाणवले आणि मी जरा सावध झालो. अगदी तेवढ्यातच कल्याणी म्हणाली की तिने गणपती करुन शाळेत नेला होता. आता फक्त ती सोंड आणि हात पुन्हा लावतेय. हो तर, मला माहिती आहे. अशा आवेशात चिंगीने मान हलवली आणि ती पुन्हा गणपतीचे हात जोडू लागली. एवढं सगळं झाल्यावर वर मी माझा experts advice देणं टाळलं. काळी माती कोराडी झाल्यावर त्याला तडे जातात. नंतर चिकटवलेले भाग सुटतात. म्हणून तर शाडू माती वापरतात. असलं काहीही न सांगता, मी 'छान! चालूदेत' असं म्हटलं आणि बाहेर ...

माझे दैवी अनुभव भाग १८

Image
अनेकदा आपल्या आयुष्यात नवे नवे अनुभव येतात आणि त्यातुनच आपण समृद्ध होतो. मला तर नेहमी असं वाटतं की नवीन कोडी सोडवण हा उत्क्रांत आणि उन्नत होण्याचा मार्ग आहे. कोणताही विषय आपल्याला पुरेसा माहिती झाला असं वाटलं की universal energy आपल्याला पुढचं Puzzle देते आणि त्यावेळी लक्षात येतं की चला ही level आपण Cross केली. तीच कोडी पुन्हा पुन्हा सोडवण्यात काही मजा नाही हो. नाही का? माझ्या बाबतीत हल्लीच एकदा असंच झालं. मी एका कामाकरिता एका Semi-Government Office मध्ये गेलेलो. माझ्या ओळखीची व्यक्ती मध्यस्थ होतीच. काम होणार याची बऱ्यापैकी खात्री होती. खरं म्हणजे मी जायची आवश्यकताच नव्हती पण ते मध्यस्थ म्हणाले की साहेबांना तुम्हाला भेटायचं आहे. मी त्यांना विचारलं की काय झालं? तर ते म्हणाले की सहसा न भेटता काम होतं पण तुम्हाला का बोलावलंय माहीत नाही. मी त्यांना विचारलं की तुम्ही त्यांना माझ्याबद्दल काही सांगितलंत का तर म्हणाले, हो सगळं सांगितलंय. असं म्हटल्यावर विषय माझ्या लक्षात आला. वेळ ठरवून आम्ही दोघे भेटायला गेलो. ते मध्यस्थांना म्हणाले तुम्ही जरा बाहेर बसा. पुढे साधारण काय असणार ते माझ्या लक्षात ...