Posts

Showing posts from May, 2023

निवडणुकीचं मानसशास्त्र

  हा विषय फार मजेशीर आहे कारण सगळं राजकारण इथे येऊन थांबातं किंबहुना राजकारण याच करता करतात. साहेबांच्या अनेक गोष्टी मला आवडतात त्यातली एक गोष्ट म्हणजे ही की ते स्पष्टपणे असं सांगतात. सत्तेत नसू तर जनतेची सेवा करता येत नाही. बाकी त्यांचे काही राजकीय शिष्य असं स्पष्टपणे न सांगता सत्तेत राहण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करतात. आपण मानवी मेंदूचं structure पहिलं तर तो समजून घेण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यातली सगळ्यात सोपी पण ढोबळ पद्धत म्हणजे Triune Brain Theory. यामध्ये असं मानलं जातं की मेंदूचे उत्क्रांती नुसार 3 भाग होतात. पहिला भाग सामान्यपणे आपल्या Basic Needs बद्दल काळजी करत असतो. दुसरा भाग आपल्या भावनांचा आहे आणि तिसरा तर्काचा. गंमत म्हणजे तर्काच्या भागापर्यंत पोहोचणारा प्रत्येक message हा पहिल्या 2 भागांतून जातो असं म्हणतात. म्हणजे तर्काच्या भागापर्यंत जाणारा प्रत्येक message हा basic needs आणि emotions च्या भागातून जातो. याची गंमत अशी आहे की तो message वाटेत अडवला जाऊ शकतो. याने काय होतं ते पुढे पाहू. मुख्य म्हणजे यातला कोणताही एक भाग प्रधान असतो आणि बाकीचे 2 supporting असतात. हॆ...

मानवी जीवनाचा अर्थशोध

  खरं म्हणजे याबद्दल मी आधीच लिहिणार होतो पण म्हटलं जरा थांबून लिहावं कदाचित जास्त नीट समजावता येईल. 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट असावी म्हणजे Lockdown च्या आधीची. एक दिवस आमच्या office च्या इथले watchman काका म्हणाले जरा गावाला जाऊन येतो. मी म्हटलं काय विशेष?  तर म्हणाले Elections आहेत, आम्हाला सगळ्यांना न्यायाला गाडी येणार आहे. मी विचारलं किती जण आहात तुम्ही? तर म्हणाले एक अख्खी बस भरून जाणार आहोत. मी म्हटलं अरे वा मज्जा आहे तुमची तर म्हणाले हो, जाताना सगळी तीर्थ क्षेत्रे दाखवणार आहेत. मी म्हटलं मग पार्टी मतदानानंतर का?  तर लाजत हो म्हणाले. मी म्हटलं आणि वरती किती? तर म्हणाले मताला 2 हजार तरी मिळतील यावेळी, Budget किती आहॆ माहिती नाही. मी म्हटलं मग मोदींना का?  तर म्हणाले नाही, Congress ला. मी म्हटलं असं कसं? मोदींनी तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेत अडीच लाख रुपये दिले ना? तर म्हणाले हो आणि कर्नाटक सरकारने साडेतीन लाख रुपये दिलेत बीनव्याजी ते काय आम्ही परत थोडीच करायचेत? मी विचारलं मग तरी मत Congress ला? तर म्हणाले हो कारण हॆ सगळं सरपंच Sanction करतो तो Congress चा ...