Posts

Showing posts from April, 2026

नवीन ग्रंथ: गोचर ग्रहांच्या गुजगोष्टी (अचूक कलनिर्णयाची सोपी पद्धत)

Image
मे २०२२ मध्ये Untold Planetary Transits हा ग्रंथ मी लिहिला. यामध्ये मी तयार केलेली व अनुभवलेली गोचर ग्रहांच्या योगातून निर्माण झालेली कालनिर्णयाची एक नवीन पद्धत मांडली. त्यावेळी मी दशा पद्धती आणि गोचर पद्धती एकत्र वापरत होतो. पण त्याबरोबरच दशा पद्धतीतील काही कोडी सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. कालांतराने ती कोडी सुटली आणि दशा पद्धती आणखिनच अचूक झाली. पण त्याबरोबरच दशा पद्धतीच्या काही मर्यादा प्रकर्षाने लक्षात आल्या. आणि मी वापरत असलेल्या गोचर पद्धतीचे फायदेही लक्षात येऊ लागले. या सगळ्यामध्ये मी गोचर पद्धती आणखिनच सूक्ष्म पातळीवर नेऊ शकलो. या पद्धतीमध्ये आणखी काही बदल केले आणि दोन्ही पद्धती एकत्र कालनिर्णय करण्यासाठी वापरू लागलो. अनुभवाने ही पद्धत एवढी सूक्ष्म झाली की मी अनेक घटनांच्या तारखांपर्यंत जाऊन पोहोचलो. माझे वडील गेल्या वर्षी आजारी होते , तेव्हा पुढील ६ महिन्यामध्ये त्यांना रुग्णालयात केव्हा दाखल करावे लागेल याच्या तारखा घरच्यांना आधीच सांगून ठेवल्या आणि त्या सगळ्या तारखा तंतोतंत जुळल्या. या अनुभवानंतर ही पद्धत नव्याने वाचकांसमोर मांडावी हा विचार तीव्र झाला.     ...