Posts

Showing posts from January, 2025

नवीन ग्रंथ: वैदिक ज्योतिषाची मूलतत्वे

Image
माझं पहिलं पुस्तक Untold Vedic Astrology प्रकाशित होऊन आता जवळ जवळ 9 वर्षे झाली. त्याच्या 6 आवृत्ती प्रकाशित झाल्या. खरं तर एवढी वर्षे झाली हे मला लक्षातच आलं नाही. पण आज छान वाटतंय. ज्यावेळी पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा कल्याणी म्हणाली की तू हे सगळं कशाला करतोयस? कोण वाचणार आहे तुझं पुस्तक? तिचं म्हणणं बरोबर होतं. एक म्हणजे या सगळ्यात मला काहीच अनुभव नव्हता. पुस्तक लिहिणं, छापणं आणि प्रकाशित करणं हा तसा मोठा व्याप होता आणि बाकी बऱ्याच priorities होत्या. Office मध्ये मोठी जबाबदारी होती. पण आमचे स्वामी म्हणायचे की आपल्याला समजलेल्या गोष्टी document झाल्या पाहिजेत. पुढे अनेकांना फार उपयोगी पडतात. त्यामुळे आपण आपल्याला समजलेलं लिहिलं पाहिजे असं मी ठरवून टाकलं होतं. आता लिहायला वेळ कसा मिळणार हा पुढचा प्रश्न होताच. तिथे सुद्धा स्वामींचीच idea वापरली. स्वामी प्रवासाला जाताना brief case घेऊन car मध्ये काम करायचे. पहिली 10 मिनिटं विषयांतर म्हणून अभंग ऐकले की त्यांच काम सुरु व्हायचं. मधे ते कोणाशीच फार बोलायचे नाहीत. ही संधी माझ्याकडे सुद्धा होती. सकाळी साधारण 7:30 ला cab यायची आणि ती 8:45 ला o...