Posts

Showing posts from July, 2024

झाडांचं बोलणं

Image
  वनस्पती आणि त्यांचे जीवनमान या विषयामध्ये मला natural interest आहे. त्यासंबंधी मी छोटे छोटे प्रयोग करत असतो. त्याचबरोबर अनेक शेती विषयक Facebook groups चा भाग आहे. मागे एकदा असाच एका group वर प्रश्न विचारला गेला की झाडावरची फळं जून होत नाहीत पिकत नाहीत तर काय करावं. यावर एका अनुभवी शेतकऱ्याने उत्तर दिलं की झाडांना पाणी 2 किंवा 3 दिवसातून एकदाच घाला. माझ्या दृष्टीने हे खूपच interesting होतं. कारण याचा अर्थ असा होतो की ज्यावेळी झाडांच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार होतो त्यावेळी झाडं आपल्या पुढच्या पिढीची तयारी करतात.  माझा यावर विश्वास बसला नाही म्हणून मी एका रिकाम्या कुंडीला पाणी देणं बंद केलं आणि विशेष म्हणजे त्या कुंडीमध्ये एकदम अनपेक्षित गवतची वाढ झाली. मग मी हाच प्रयोग टोमॅटो आणि राजगिऱ्याच्या पालेभाजीवर केला. त्यातही तोच अनुभव आला. आणखी काही प्रयोग करता माझ्या लक्षात आलं की ज्यावेळी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा झाडं पटकन जून होतात त्यांना फुलं फळं येतात आणि ती गळूनही पडतात. थोडक्यात आपण नाहीतर आपली प्रजाती टिकून रहावी हा झाडांचाही प्रयत्न असतो. हे खरंच विशेष आहे...