झाडांचं बोलणं
वनस्पती आणि त्यांचे जीवनमान या विषयामध्ये मला natural interest आहे. त्यासंबंधी मी छोटे छोटे प्रयोग करत असतो. त्याचबरोबर अनेक शेती विषयक Facebook groups चा भाग आहे.
मागे एकदा असाच एका group वर प्रश्न विचारला गेला की झाडावरची फळं जून होत नाहीत पिकत नाहीत तर काय करावं. यावर एका अनुभवी शेतकऱ्याने उत्तर दिलं की झाडांना पाणी 2 किंवा 3 दिवसातून एकदाच घाला.
माझ्या दृष्टीने हे खूपच interesting होतं. कारण याचा अर्थ असा होतो की ज्यावेळी झाडांच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार होतो त्यावेळी झाडं आपल्या पुढच्या पिढीची तयारी करतात.
माझा यावर विश्वास बसला नाही म्हणून मी एका रिकाम्या कुंडीला पाणी देणं बंद केलं आणि विशेष म्हणजे त्या कुंडीमध्ये एकदम अनपेक्षित गवतची वाढ झाली. मग मी हाच प्रयोग टोमॅटो आणि राजगिऱ्याच्या पालेभाजीवर केला. त्यातही तोच अनुभव आला. आणखी काही प्रयोग करता माझ्या लक्षात आलं की ज्यावेळी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा झाडं पटकन जून होतात त्यांना फुलं फळं येतात आणि ती गळूनही पडतात. थोडक्यात आपण नाहीतर आपली प्रजाती टिकून रहावी हा झाडांचाही प्रयत्न असतो. हे खरंच विशेष आहे कारण झाडं स्वतःला प्रजाती म्हणून ओळखतात असा त्याचा अर्थ होतो. ते केवळ unconsciously केलेलं बीज प्रसारण नसतं.
यानंतर काही interesting गोष्टी वाचनात आल्या. झाडं मुळाच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूच्या झाडांशी communicate करत असतात. एक झाड मेलं किंवा कापलं तर आपल्या जीवाला धोका आहे असा संदेश आजूबाजूच्या झाडांना सुद्धा जातो आणि ती झाडं त्यानुसार त्यांचं वागणं बदलतात. झाडांच्या बाबतीत या आणि अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात.
आता आणखीन एक गंमत सांगतो. आमच्या office मधे एक तुळस आहे. माझी अशी पद्धत होती की जून झालेल्या मंजिऱ्या त्याच कुंडीत टाकायच्या. यात मला असं अपेक्षित होतं की त्या कुंडीत तुळशीची अनेक रोपं तयार होतील. पण गंमत म्हणजे त्या कुंडीत एकही रोप येत नव्हतं. आता असं का होतंय असा प्रश्न मला होता. या मे महिन्यात आम्ही बाहेरगावी गेलो असता पाणी न मिळाल्याने ती कुंडीतील तुळस मेली. आता घाई घाईने दुसरी तुळस लावण्यापेक्षा कुंडीला रोज पाणी देत राहू असा विचार मी केला. माझं hypothesis होतं की आता तुळशीची रोपं उगवली पाहिजेत. गंमत म्हणजे काही दिवसात मला तुळशीची काही रोपं दिसू लागली आणि माझी hypothesis खरी आहे याचा आनंद झाला. आता त्यातली काहीच रोपं मोठी झाली आहेत आणि ती सुद्धा कुंडीच्या 2 विरुद्ध टोकावरची आहेत. यातून एक नबीन शंका निर्माण होते. झाडं बियांशी सुद्धा संपर्क करत असावीत की काय? असं जर असेल तर आपली पुढची पिढी कोण आहे हे झाडांना कळत असलं पाहिजे. पुढच्या पिढीला जन्म कधी घ्यायचा हे कळत असलं पाहिजे. आणि आपलं कुटुंब / प्रजाती टीकवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असला पाहिजे. कारण जोपर्यंत तुळशीच झाड होतं तोपर्यंत जवळ जवळ 3 वर्षात एकही रोप त्या कुंडीत उगवलं नाही. खरं म्हणजे मी सगळी वर्षे जून झालेल्या मंजिऱ्या तोडून त्याच कुंडीत टाकत आलोय. पण जेव्हा तुळशीच झाडं मेलं तेव्हा अगदी लगेचच त्या कुंडीत तुळशीची काही रोपं उगवली. याबद्दल तुम्हाला काही माहिती / अनुभव आहेत का? नक्की share करा.
(C) Gaurish Borkar
#gaurishborkar #thinkingaloud
Comments
Post a Comment