Posts

Showing posts from October, 2023

दैवम् चैवात्र पंचमं?

Image
ज्योतिषाच्या बाबतीत दैवम चैवात्र पंचमम् म्हणजे दैव हे भगवंतांनी शेवटचं सांगितलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी या कर्मावर अवलंबून असून दैवाला अतिशय नगण्य महत्त्व आहे हे सांगण्याकरता भगवद्गीतेचा अभ्यास करणाऱ्या काही अध्यात्मिक व्यक्ती ही ओळ वापरतात. केवळ दैवावर अवलंबून राहून स्वतःचे नुकसान करून घेणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण त्याचबरोबर प्रामाणिक प्रयत्न करून अपयश आल्याने दैव समजून घेण्याचा  प्रयत्न करणारे सुद्धा बरेच आहेत. या सगळ्या विषयावर आपण चर्चा करण्याऐवजी गीता या विषयावर खरंच हे लोक म्हणतात तसं म्हणजे दैव पाचवं  आहे असं म्हणते का हे पाहूया. अगदी दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की नत्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनािधपाः।  न चैव न भविष्यामः सव वयमतः परम् ॥१२॥ भगवद्गीता अध्याय २ अर्थ: मी कोणत्याही काळे नव्हतो,  तू नव्हतास,  किंवा हे राजे लोक नव्हते असे नाही. आणि यापुढेही आपण सर्वजण असणार नाही असेही नाही. याचा अर्थ असा होतो की भगवद्गीतेला पुनर्जन्माची कल्पना मान्य असावी.  पुढे दुसऱ्याच अध्यायात  भगवान म्हणतात की हतो वा प्राप्स्यसि स्...