श्री कृष्णाच्या १६१०० बायकांची गोष्ट
भगवान कृष्ण आणि त्यांच्या लीला याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात त्यातला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे भगवान कृष्ण यांच्या १६१०० पत्नी. याबद्दल मला बरेच दिवस लिहायचं होतं पण केरला स्टोरीच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा Radar वर आला म्हणून म्हटलं आता यावर थोडं लिहूया. मधे व्यस्त होतो म्हणून लिहायला थोडा उशीर झाला. ही कथा भागवत पुराणातल्या दहाव्या स्कंधातील ५९ व्या अध्यायात येते. त्या असुराच खरं नाव आहे भौमासुर. त्याला नरकासुर सुद्धा म्हणतात. कथेचा सारांश असा आहे की भौमासुराने बंदी केलेल्या 16100 राजकन्या भगवान कृष्णांनी भौमासुराचा वध करून सोडवल्या पण अशा राजकन्यांना कोण स्विकारणार असा प्रश्न निर्माण झाल्याने त्या राजकन्यांनी भगवान कृष्णांचा आश्रय घेतला. आधी थोडं असुर या शब्दाबद्दल सांगतो. आपल्याकडे ३ वेगवेगळे शब्द वापरले जातात. पहिला दैत्य, दुसरा राक्षस आणि तिसरा असुर. आपल्याला वाटतं तिन्हींचा अर्थ एकच आहे पण भाषाशास्त्राप्रमाणे असं नसतं. दैत्य हा वेदांतील शब्ध आहे. आदिती आणि दिती अशा २ बहिणी होत्या. आदितीचे पुत्र ते आदित्य आणि दितीचे पुत्र ते दैत्य. राक्षस हा शब्द mostly आपल्याकडे त्र...