एका शेतकरी उद्योजकाची गोष्ट
चला आता थोडा वेळ मिळतोय तर थोडं बोलूया. मागे सांगितल्याप्रमाणे आता माझे दैवी अनुभव पुन्हा सुरु करायचीच आहे पण आज थोडी वेगळी गोष्ट. गेल्यावर्षी मी एका व्यक्तीला अगदी जुजबी भेटलो होतो कारण त्यांनी माझं पुस्तक अगदी जाता जाता विकत घेतलं होतं. परवा पुन्हा भेट झाली पण आम्ही एकमेकांना ओळखलंच नाही. मी माझं नाव सांगितल्यावर ते म्हणाले, तुमचं पुस्तक मी वाचलं, मला फार उपयोगी पडलं. मागच्यावर्षी 350 रुपयाचं पुस्तक घ्यावं की न घ्यावं असा विचार करणारा हा माणूस मला आठवला. त्याने मला थोडा discount द्या अशी विनंती केली होती आणि मी ती नाकारली होती कारण मी आधीच सवालतीच्या किंमतीत पुस्तकं विकत होतो. तो सगळा प्रसंग आता माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. तुमची आणखी पुस्तकं मराठीत असतील तर मला हवी आहेत असं त्याने मला सांगितलं. पण माझं तेवढं एकच पुस्तक मराठीत असल्याने आमच्या बोलण्याचा ओघ थोडा बदलला. मी त्यांना विचारलं कि तुम्ही काय करता? ते म्हणाले मी आज खाण्याचे पदार्थ विकायला आलोय. माझा गोडा मसाला 400 रुपये किलो आहे. बाजारात 600 रुपये किलो मिळतो. या किंमतीला कोणीही देणार नाही हवा असेल तर जा घेऊन थोडा. लगेच माझ्य...