माझे दैवी अनुभव भाग १२
दरवर्षी प्रमाणे असाच एकदा देवीच्या दर्शनाला गेलो होतो. पूजा झाल्यावर देवीच्या देवळातून निघण्यापूर्वी नमस्कार करताना देवीला म्हटलं “आई, कर्म आणि त्याचं फळ याबद्दल अजून नीट समजलं नाहीये तर जरा नीट समजलं तर छान होईल.” अगदी सहजच म्हटलेलं त्यामुळे विषय तिथेच संपला. त्यादिवशी योगायोगाने आमचे काही नातेवाईक सुद्धा तिथे आले होते. तिथून पुढे हरिहरेश्वरला जायचा आमचा Plan होता. बोलता बोलता ते म्हणाले की हरिहरेश्वर आमचा कुलपुरुष आहे तर या निमित्ताने आम्ही सुद्धा येतो. आमचंही जाणं होईल. आम्ही म्हटलं चला, सोने पे सुहागा. त्यानुसार हरिहरेश्वर मध्ये एका Homestay ला Phone करुन Booking केलं. त्यावेळी आम्ही नवीनच Ertiga घेतली होती आणि ती Key Less होती. आमच्या नातेवाईकांचा Driver म्हणाला “काय? Car आणि चावीशिवाय? आजकाल काय काय येईल सांगता येत नाही”. आणि थोडा कुत्सित हसला. विषय तिथेच संपला. संध्याकाळ पर्यंत आम्ही हरिहरेश्वरला पोहोचलो, Homestay वर Lagguage ठेवलं, Fresh झालो आणि जेवायला जवळच्या एका खानावळीत गेलो. छान जेवण करून आल्यावर अगदी झोपायच्या तयारीत होतो. Driver करीता झोपायची वेगळी व्यवस्था होती त्यामुळ...