मराठी ग्रंथ: वैदिक नक्षत्र ज्योतिष
वैदिक ज्योतिषामध्ये नक्षत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषाच्या काही शाखांमध्ये नक्षत्रे मुख्यत्वाने उपयोगात आणली जातात पण सर्व शाखांमध्ये त्यांचा वापर विशेष दिसत नाही. नक्षत्रांची संख्या राशींपेक्षा दुपटीहून जास्त असल्याने काहींना नक्षत्र ज्योतिषाचा अभ्यास आव्हानपूर्ण वाटू शकतो. वैदिक ज्योतिष मुख्यत: नक्षत्रावर आधारित होते आणि काळाच्या ओघात ते राशी आधारित झाले असावे. हे सहज घडलेले स्थित्यंतर आहे की जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न हे कळायला काही मार्ग नाही. वेद हे ज्ञानाचे भंडार आहे यात दुमत नाही पण वेदांचा अर्थ कसा समजायचा हे मात्र मोठे आव्हान आहे आणि यामुळेच आपली वेदांची समज सीमित राहीली आहे. आनंदाचा भाग असा की वेद आपल्यापर्यंत परंपरेने आले आहेत आणि आपण त्याकडे नविन दृष्टिकोनातून पाहू शकतो. नक्षत्रें हा मुहूर्त ज्योतिषाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचबरोबर तो वैदिक संस्कृतीचा सुद्धा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे नक्षत्र आणि वैदिक संस्कृती सहजच एकमेकांशी जोडली गेली आहेत. माझा असा समज आहे की वैदिक ज्योतिष आधी रोजच्या व्यवहारात उपयोगात येउु लागले आणि नंतर त्याचा उपयोग वैयक्त...